// श्री स्वामी समर्थ //
" खंडाळा बोगदे "
लहानपणी सुट्टी मधे मुंबईला जाताना येथिल वीस - पंचवीस बोगदे बघत जायला फार मजा येत असे.हे सर्व बोगदे सुरू होण्याच्या आधीच कर्जतला दुसरे इंजीन जोडणे - काढणे वगैरे कार्यक्रम बघायला पूर्ण गाडी प्लॕटफार्म वरती उतरलेली असे. त्या नंतर मात्र बोगदे सुरु झाले की लख्ख प्रकाश - आणि अंधार यांचा खेळ आणि डोंगरावरुन वहाणारे पाण्याचे प्रवाह दिसत असत. आमच्या एका खोपोलीच्या मित्राच्या घरी जाताना मात्र हे बोगदे कसे बघायचे याचे प्रशिक्षण मिळाले. अतिशय हळूहळू जाणाऱ्या गाडीने प्रवास करायचा. शक्यतो दरवाज्या मधे पायऱ्यांवर बसायचे आणि मनमोकळेपणाने हा थरार अनुभवायचा. साधारणपणे 'मंकी हिल' येथे गाडी थांबली की माकडांना लाजवेल अशा लवचिक आणि जिद्दी कातकरी किंवा मावळा मधील त्या शूर विरांचे स्मरण करायचे . इंग्लिश मंडळींच्या हाताखाली हे बोगदे बांधताना शेकडो कारागीर मरण पावलेले आहेत.त्या वेळी उपलब्ध अवजारांनी निसर्गाशी दिलेला लढा दिसायला लागला. घोरपडी सारखी घट्ट पकड असलेले तळकोकणातील वीर दिसायला लागले. निसर्गाचा समतोल न बिघडवता या निसर्ग पुत्रांनी मेहनतीने बांधलेले हे चिरंतन बोगदे आहेत. तुम्हाला सुद्धा कधी हा आनंद घ्यावा वाटला तर एसी डबा , निर्जीव लँपटाप वगैरे गोष्टी घरी ठेवून मोकळ्या मनाने हे बोगदे बघायचा आनंद घ्या.. Black body effect मुळे बोगद्यातील गडद अंधार किंवा त्या मधून बाहेर आल्यावर दिसणारा हिरवागार निसर्ग , पाण्याचे कोसळणारे धबधबे आणि त्या बरोबरच रुळांमधून ऐकू येणारे त्या अनाम शूर विरांचे धिरगंभीर तालातील गीत! "कशासाठी पोटासाठी खंडाळ्याचा घाटासाठी " !
विनायक जोशी (vp)
30 August 2015
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६
खंडाळ्याचे बोगदे !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा