शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

"अजित ओक " आधुनिक शेतकरी !

// श्री स्वामी समर्थ //
    " अजित ओक "
' आधुनिक शेतकरी "
अजित हा आमच्या शेजारी रहाणारा माझा बाल मित्र आहे. आमच्या लहानपणी यांच्या घरी सहा परदेशी गायी , चार म्हशी , दोन अल्सेशियन कुत्री , एक पोपट आणि नर्सरी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ३०० रोपे आणि घरातील सात माणसे असा गोतावळा होता.बागेत एक छान विहीर आहे. बागेत एका कोपऱ्यात एक मोठ्ठा खड्डा खत तयार करायसाठी होता.या मधे शेण , कडबा , झाडांची पाने , बागेतील कचरा आणि असंख्य गांडुळे मुक्कामाला असत.अजित मुळे गुरांचा गोठा , कुत्र्यांच्या हरकती आणि रोपांची मशागत या विषयी वस्तूनिष्ठ ज्ञान मिळत असे.दहावी नंतर मात्र त्याने commerce साईड घेतली . या नंतर MBA करुन पुण्याला चांगल्या कंपनीत नोकरीला लागला.अचानकपणे  वडिलांच्या झालेल्या  अकस्मिक निधनाने हि चांगली नोकरी सोडून सोलापूर मधे रेल्वे खात्यात नोकरी करावी लागली . घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्याने सोलापूर जवळच दहा एकर शेती घेतली. वयाच्या ५० व्या वर्षी नोकरी सोडून  पूर्णपणे शेतीला वाहून घेतले.आज हा दहा एकराचा पट्टा हा आदर्श बनला आहे.जमीनीतील पाण्याचे कमीतकमी बाष्पी भवन व्हावे म्हणून त्याने बांधा वरती विचारपूर्वक झाडे लावली आहे.शेती चे कंपाऊंड वेगवेगळ्या रंगाच्या झाडांनी आकर्षक बनवले आहे. या शेती बरोबरच Rain harvesting साठी मोफत मार्गदर्शन करत आहे. विवेकानंद संस्थेला या विषयात त्याची  खुप मदत होत आहे. कोणावरही अवलंबून न रहाता योग्य दिशेने आणि कालानुरुप अशी शेती करत आहे. अगदी लहानपणापासून त्याला प्रचंड कष्टाची सवय असल्यामुळे या आमच्या मित्राला पूर्णपणे तो  करत असलेल्या कामाचे समाधान आहे. घरच्यांनी त्याच्या सर्व निर्णयांना कायम पाठिंबा दिला आहे.या सर्व गोष्टी मधे येणारे चढ ऊतार सहन करण्यासाठीची ताकद मात्र कायम बरोबरीने सहभागी असलेल्या आईच्या मुळे टिकून आहे !
विनायक जोशी (vp)
20 October 2015
electronchikatha.blospot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा