मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

ज्योतिषी हेमंत खोले

// श्री स्वामी समर्थ //
    " हेमंत खोले "
    ' ज्योतिषी "
साधारणपणे २४ वर्षापूर्वी माझ्या वडीलांनी 'ज्योतिष' या विषयाची  परीक्षा देण्याचे ठरवले.अर्थातच व.दा.भट आणि म.दा.भट वगैरे मंडळींची या शास्त्रा विषयी असलेली पुस्तके आणून अभ्यास चालू झाला. त्यांना लिहायला मदत म्हणून मी काम करू लागलो. साधारणपणे १९३० पासूनची बरीचशी 'पंचांग' गोळा केली. २०० पेक्षा अधिक लोकांच्या जन्म तारखा , जन्म ठिकाणे वगैरे माहिती घेतली.त्या नंतर 'दशा' , 'महादशा' वगैरे काढून पत्रिका तयार करणे असा अत्यंत कंटाळवाणा कार्यक्रम पार पाडावा लागे . परीक्षा पास होऊन सुध्दा परत कधीही वडील या अवघड शास्त्राकडे वळले नाहीत.
पुढे ५-६ वर्षांनी आमच्या कंपनीमधे हेमंत खोले नावाचा मुलगा आला.तो AutoCAD वापरून सर्व mechanical  drawings काढत असे. याचवेळेला  cricket world cup चालू होता.अतिशय प्राथमिक अवस्थेतील मँचेस चालू असतानाच त्याने फायनल जिंकणारा अनपेक्षित संघ कोण त्याचे नाव सांगितले . त्यावेळेला तो  कृष्णमूर्ती पध्दतीने ज्योतिष शिकत होता.अर्थातच निकाल त्याने सांगितला तसाच आला.
पुढे त्याने सांगितलेली ६०% भविष्ये खरी येऊ लागली. या विषयात खोलवर जाण्यासाठी त्याने 'गुरू चरित्राचे ' पारायण किंवा दत्त महाराजांची आणि इतर  साधना चालू केली. आता त्याची अचूकता ९० % पर्यंत आहे असे त्याचे म्हणणे आहे.
या शास्त्राचा सर्वात महत्त्वाचा आणि कमकुवत दुवा म्हणजे विचारायला येणारे कोणताही feedback देत नाहीत. Problem solve झाला म्हणून लोक परत येत नाहीत. किंवा काहीच उपयोग झाला नाही म्हणून येत नाहीत.
एखाद्या माणसाला पुढे येणारा  'धोका'दाखवणे एवढेच हे शास्त्र करते .तो टाळणे किंवा पार करून जाणे हे आपल्यालाच करावे लागते.
आपल्याला अतिशय आनंदाने जगण्यासाठी पुढच्या क्षणाला काय होणार याचे ज्ञान परमेश्वराने  दिलेले नाही. परंतु बऱ्याच वेळेला ज्योतिषा ने सांगितलेल्या पाॕझीटीव्ह गोष्टींचा खुप आधार वाटतो.
ज्योतिष या शास्त्राला शास्त्रीय कसोटीला सामोरे जायचे असेल तर भविष्य विचारणाऱ्या सर्व मंडळींनी feedback देणे अत्यंत आवश्यक आहे.

            विनायक जोशी (vp)
             २२ जून २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा