// श्री स्वामी समर्थ //
" राँम मधले फोटो "
आपल्या आयुष्यात काही फोटो हे पर्मनंट मेमरी मधे जाऊन बसतात. काल "सकाळ"मध्ये दोन महान कलाकारांचा अतिशय सुरेख फोटो आला आहे. लोकप्रिय आणि सुसंस्कृत अशा शहेनशहाने म्हणजेच अमिताभने अभिनयातील बादशहाला म्हणजेच दिलीप प्रभावळकरांना अत्यंत आत्मियतेने केलेला नमस्कार !
काही वर्षापूर्वी बंगलोरला राष्ट्रपती अब्दुल कलाम ईन्फोसीसला भेट देणार होते. त्यांना अनपेक्षित रीत्या उशीर झाल्यामुळे मेनगेट च्या बाहेर गर्दी पासून दूर एका अतिशय साध्या बाकावर बसून त्यांची वाट बघणारे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा फोटो .
नर्मदा बचाव आंदोलन पूर्ण झाल्यावरच परत आनंदवना मध्ये येणार असा निश्चय करुन गेलेले परंतु आपले अत्यंत प्रिय आणि महाराष्ट्राचे लाडके असे "पुल "तब्बेत बरी नसल्यामुळे हवापालट करण्यासाठी आनंदवनात येणार कळल्यावर आनंदवनात त्यांच्या स्वागताला उभे असलेले आणि एकमेकांना बघून अत्यंत आनंदाने हसणारे बाबा आमटे आणि पुलंचा फोटो.
आता हे फोटो बघायला फक्त डोळे नकोत तर निवांतपणा आणि अंतर्मनाची जागृती पाहिजे !
विनायक जोशी (vp)
१९ जून २०१५
electronchikatha.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा