बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

" मंत्र जागर "

// श्री स्वामी समर्थ //
  " मंत्र जागर "
मंत्र हि जादू नाहीये. हि वेगवेगळ्या प्रकारची स्पंदने आहेत.हे मंत्र अतिशय स्पष्ट उच्चार आणि योग्य ठिकाणी , अर्थपूर्ण पद्धतीने  आघातांचा वापर करुन म्हणावे लागतात . आमच्या घरी गौरी आल्या नंतर दुसऱ्या दिवशी "मंत्र जागर " होत असत. देवघरा मधे समोरासमोर सहा गुरुजींच्या जोड्या बसत आणि सुमारे तासभर हा कार्यक्रम चालत असे. साधारणपणे अंताक्षरी सारखे समोरच्या गुरुजींचे म्हणणे संपले की दुसऱ्या टिम ने म्हणायचे. या मधे श्रवणीय जुगलबंदी चालू असे.  अंगात संचार आलेल्या माणसाच्या समोर हा कार्यक्रम चालू असेल तर गुरुजींना काही मंत्र परत म्हणावे लागत. आमच्या कडे 'बेलसरे' नावाच्या काकू आल्या की हे हमखास घडायचे. मला स्वतःला या क्षेत्रातील अजिबात ज्ञान नसले तरी या वेळी  निर्माण होणारी vibrations कमालीची आवडायची.माझे काम अँरेंजर चे असल्यामुळे फक्त वेळेवर आणि समाधानकारक पणाने कोणताही कार्यक्रम पार पाडणे येवढीच माझ्यावर जबाबदारी असायची.प्रत्यक्ष गौरी-गणपती , आई -वडील आणि काँलनी मधील रसिक मंडळी एवढे जण हा मंत्र जागर ऐकायला असायचे ! कोणत्याही प्रार्थनेच यश हे त्या मधून निघणाऱ्या vibrations मधे किंवा स्पंदनांमधेच आहे.
विनायक जोशी (vp)
  19 September 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा