मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

महाराष्ट्रातील इंजिनियर्सचे तिर्थक्षेत्र !

// श्री स्वामी समर्थ //
" इंजिनियर्स चे तिर्थक्षेत्र  "
आपल्याला महाराष्ट्रातील  उत्तम दर्जाचे इंजिनियर बनायचे आहे असे ज्यांना वाटते त्यांनी अवश्य  विदर्भातील असंख्य खाणींनी समृद्ध असलेल्या आणि त्या तेथे चालू अवस्थेत असलेल्या Process Plants ना जरुर भेट दिलीच पाहिजे. १९८७ साली मी माझ्या वयाच्या २४ व्या वर्षी  येथे गेलो होतो. इंजिनियरींग क्षेत्रांतील अनेक आधुनिक संकल्पना तेथे बघायला मिळाल्या .सुरवात हि 'खाणीं 'पासून झाली.या ठिकाणी पाहिजे तेवढिच खोदाई करण्यासाठी कंट्रोल्ड  स्फोट घडवणे चालू होते.हि खाण पुढील ७५ वर्षे वापरात येणार होती.तेथून हे मटेरियल अत्यंत अवजड अशा वाहनांमधून मोठ्या  अशा लोखंडी हातोड्यांच्या मशिन मधे टाकले जात होते.या इथे हत्तीचा सुद्धा चुराडा होवून जाईल असे महाकाय हातोडे होते. त्या नंतर मोठमोठया आणि वेगवेगळ्या आकाराच्या लोखंडी गोळे असलेल्या बाॕल मील्स होत्या .अतिशय मोठे सायलोज होते . अती उष्ण तापमानाला चालणाऱ्या भट्या होत्या . साधारणपणे 60 ते 70 फुट उंचीचे मोठे फँन मटेरियल हलवत होते . हवेत प्रदुषण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे Electro Static Precipitors होते . असंख्य ठीकाणी मटेरियलचे आॕनलाईन वजन होत होते आणि त्याच वेळेला दर्जा सुद्धा तपासला जात होता. एकाच वेळी मटेरियल मधील ८० प्रकारच्या गोष्टी दाखवणारे X-ray spectro meters होते .असंख्य PID controllers , मोठे Central Control Room होते.थोडक्यात म्हणजे Mining ,Heavy machines ,Mechanical ,
Instrumentation,Electrical, Civil ,
environmental engineering , chemical labs वगैरे इंजिनियरींग मधील खुपशा शाखां मधील  आधुनिक संकल्पना बघायला मिळाल्या . हा Process Control Plant म्हणजे कमीतकमी ४० ते ५० Automatic assembly lines चा एकमेकांशी चालू  असलेला सुरेल संवाद होता.या ठिकाणी जर्मन , जँपनीज , डेन्मार्क वगैरे ठिकाणाहून आलेले असंख्य इंजिनियर आपापल्या मशिनची भारतीय हवामानातील निरीक्षणे नोंदवून योग्य ते बदल करत होते . खुप मोठे जंगल , गौड आदिवासी ,मोठ्या संख्येने  असलेले वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव किंवा  पावसाळ्यात दोन  महिने जगाशी तुटणारा संपर्क , जबरदस्त ऊन वगैरे गोष्टींशी जुळवून घेत हा कारखाना चालू झाला होता.या ठिकाणी सर्व जिगरबाज मंडळींचा राबता होता .संपूर्ण देशभरातून असंख्य इंजिनियर येथे कामाला आले होते. महाराष्ट्रातील या कारखान्यात एकच दुर्मिळ गोष्ट होती ती म्हणजे मराठी इंजिनियर्स !
विनायक जोशी (vp)
18 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा