// श्री स्वामी समर्थ //
" पहिला रोबो "
पुण्यात मंगेश काळे यांनी PARI कंपनी चालू करायच्या आधीच पहिला रोबो पहायचा योग आला. माँडर्न कँफे समोर IETE च्या Hall मधे त्याचे पहिले दर्शन घडले. मेगास्टार रजनिकांतच्या सिनेमात दाखविल्याप्रमाणे रोबो असेल या अपेक्षेने आम्ही गेलो होतो.तेथे मात्र एक इलेक्ट्रो मेकँनिकल हात होता.हा अवघड वाटणारी बरीच कामे न कंटाळता करणार होता.माणसांना धोकादायक ठरणाऱ्या ठिकाणी हा काम करणार होता.या प्रसंगाच्या आधी ६ -७ वर्षे सोलापूर मध्ये अविनाश बरोबर किर्लोस्करांच्या शिवशाही नावाच्या कारखान्यात गेलो होतो. तेथे आगिचे लोळ आणि
ठिणग्यांचे राज्य असलेल्या असंख्य
भट्यांमधे वेगवेगळ्या प्रकारची casting तयार होती.त्या ठिकाणी वावरताना अंगावर गरम मेटलचे असंख्य बारीक कण पडत असत. IETE सेंटर मधून बाहेर पडताना शिवशाही मधील आगीच्या लोळांच्या जवळ Robo दिसत होता आणि सुरक्षित अंतरावरुन त्याला कमांड देणारा इंजिनियर म्हणजेच
"अविनाश मायदेव !!
विनायक जोशी (vp)
11 October 2015
electronchikatha.blogspot.com
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६
पहिला रोबो !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा