" Diode "
"एक आनंदात रहाणारा मित्र !!
या मित्राची आणि माझी पहिली भेट त्याच्या TV नावाचा मोठ्या घरात झाली. त्या वेळी तो साधारणतः लहानशा काचेचा घरात शात पणे खाली मान घालून बसला होता.थोड्या अंतरावर EHT तयार करणारा त्याचा रागीट भाऊ बसलेला होता .कधी चुकून मर्यादा ओलांडली कि हा भाऊ रागाने निळी ज्योत टाकत असे.
मी जेथे जाईन तेथे हा Diode आधिच पोचलेला असायचा त्या मुळे नवीन ठिकाणी गेलो तरी परके वाटायचे नाही.
त्या नंतर मात्र त्या ने आपला आकार छोटा करुन Digital नावाच्या नविन जागेत तो रहायला गेला. सुरवातीस तो 'OR ,Nor,And, वगैरे ठिकाणी दिसायला लागला.
याचवेळी चौघांचा group करून Bridge या नावाने power supply मधे त्याने प्रवेश केला. आपल्या एका जाड capacitor मित्राला बरोबर घेउन सेकंदाला ५० वेळेला नाचणाऱ्या Ac ला दिड पटीने वाढवुन शांत अशा Dc च्या रुपात मधे जेरबंद केले.
या नंतर मात्र त्याने कमाल केली तो स्वतः भोवती लाल, निळा,पिवळा असे रंग सोडू लागला.अर्थात नविन नावाने Led म्हणून . त्याच्या ह्या रुपाने अतिशय लोकप्रियता मिळवली. त्या नंतर आठ जण एकत्र येऊन अर्थपूर्ण भाषेत बोलायला लागला. अर्थातच Display या नावाने. उन्हाळ्या पासुन सुटका करुन घेण्यासाठी त्या ३२ जणानी एकत्र पणे क्षार असलेल्या liquid मधे पोहायला सुरवात केली. १६ *२ चा Lcd बनून .
याच वेळेला Emergency Call आला म्हणून तो power ckt कडे गेला. याचे प्रमुख काम असायचे coil मधील राहिलेले magnetisum काढून टाकणे आणि driver transistors ना मरणा पासुन वाचवणे. Mosfet मधे तो आधीच आत जाऊन बसलेला असे Body Diode म्हणून .
कंट्रोलरचा जगात मात्र हा अधीच Prom, EPROM, मेमरीज मधे जाऊन बसला होता.
त्याला मर्यादे बाहेर काम दिले की रागाने काळा होवून कायमचे काम बंद करायचा. उलट दिशेने गर्दी वाढली कि कायमचा दोन्ही दिशेने दरवाजा ऊघडा ठेवून Heart attack येणाऱ्या Transistor कडे बघत बसायचा.
मला या क्षेत्रात हात धरुन आत्मविश्वासाने चालायला मदत करणाऱ्या "Diode" नावाच्या मित्राला सलाम !!
विनायक जोशी (vp)
2 June 2015
शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६
Diode एक सच्चा मित्र !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा