गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

Clutch & Brake

// श्री स्वामी समर्थ  //
  " Clutch & Brake "
महाराष्ट्रामधे दुध पाँलिथीन पिशव्यां मधे भरायचे पहिले मशीन "मदर डेयरी "मधे आले. ते फ्रेंच बनावटीचे होते. या मशीन मधे ठराविक आकाराच्या पिशव्या काढण्यासाठी एक मोटार , एक दणकट गियर बाँक्स आणि Clutch & Brake अशी टीम होती. हे Clutch आणि Brake electro magnetism चे तत्त्व वापरुन चालत होते.एका मिनीटात ५० वेळा ते आँपरेट होत. या दोघांच्या बरोबर मध्ये ०.३mm गँप ठेवून Armiture plate असायची . मशीन मधील सर्वात जास्त घर्षण होणारा आणि तरी अचूक पणे दीर्घकाळ चालणारा हा विभाग होता. Inductor , magnetism, Non magnetic material , magnetization , De- magnetization , जास्त temperature ला टीकणारे epoxy वगैरे सर्व गोष्टींची सातत्याने तपासणी करुन वापरण्यास सोप्पे , दणकट  आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय बनावटीचे पहीले CBC (clutch brake assembly )युनिट करण्यासाठी 2 वर्षे लागली. या सातत्याने केलेल्या संशोधनामुळे मशीन मधील  महत्त्वाचा कामासाठी दुसऱ्या वरती अवलंबून रहाणे संपुष्टात आले. पुढे बरीच वर्षे त्याचे लाईफ वाढविण्यासाठीचे प्रयत्न चालूच होते . या संशोधनाच्या वेळी electronic हे पांढऱ्या वरती काळे करायचे शास्त्र नसून अनुभुती देणारे आहे याची जाणीव झाली. मशीन चालू असताना एखादे blade किंवा screw driver या clutch किंवा brake च्या जवळ नेला की magnetism चा चमत्कार बघायला मिळायचा. ते डोळ्यांनी दिसत नाहीये परंतु एक प्रकारचे आकर्षण म्हणून अस्तित्वात आहे याची
प्रचिती आली . गेली ३० वर्षे हाताळून , अनुभवून सुध्दा ज्याच्या बद्दलचे आकर्षण कणभर ही कमी झाले नाही असे electro magnetism आणि  त्यांचाच वापर करुन तयार झालेले Hi speed  Clutch & Brake unit म्हणजे एकदम cool ....!
विनायक जोशी (vp)
26 October 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा