// श्री स्वामी समर्थ //
"कानमंत्र "
" मिली सेकंद च्या जगात "
शक्यतो अतिशय गोंगाट असेल अशा जागी हा सराव करावा. त्यामूळे एकाग्रतेचे बरेच फिल्टर्स वापरले जातात.. एक छानसा सायक्लीक टायमर घ्या . अंदाजे टायमींग एक सेकंद आँन आणि एक सेकंद आँफ ठेवा.त्याच्या output ला एक लाल रंगाचा Led लावा. शांतपणाने १५ सेकंद Led कडे बघून 'आँन 'आणि 'आँफ ' ची cycle observe करा.बरोबर १ मिनीटांनी परत एकदा हीच पध्दत रीपीट करा.असे ५ वेळा करुन थांबा. आता Led च्या parallel मधे रिलेची काँइल जोडा. आता वरील sequence दोन वेळा रिपीट करा.डोळे बंद करा .रिले वरती बोट ठेवा.आता फक्त रिलेच्या आवाजाचा वेध घ्या .साधारणतः अशा ५० सायकल्स तुम्ही एकाग्रतेने observe केल्यात की मशीन मधील ऐकू येणारे आवाज आणि त्याला लागणाऱ्या mill seconds च्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी हळुवारपणे तयार होत आहात असे समजायला हरकत नाही.
विनायक जोशी (vp)
२६ जून २०१५
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६
मिली सेकंद च्या जगात !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा