शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

चमच्यांचा जगात !

// श्री स्वामी समर्थ //
   " चमचा आणि चमचे "
चमचा आणि चमचे या इंग्रजांनी भारतातील देशी इंग्रजांना कायम स्वरुपी भेट दिलेल्या अमूल्य गोष्टी आहेत.एखादा चविष्ट पदार्थ रसरशीत पणे न खाता शिस्तबद्ध पद्धतीने खाण्यासाठी करावी लागणारी कसरत ही या चमचांची खासीयत. हे चमचे कोणतीही गोष्ट त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर जात असेल तर "काटा" नावाच्या नातलगाला बोलावून समोरच्याचा न कळत काटा काढतात . पुण्यात आल्या नंतर म्हणजेच १९८१ च्या जून महिन्यात ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुढे आल्यावर "हॉटेल निरंजन" मधे पहिला मसाला डोसा मागवला. त्या दिवशी अत्यंत आनंदी मनाने या डोशा बरोबर आलेल्या काटा आणि चमचाला निरोप देऊन मस्त हाताने डोसा खाल्ला . या दिवसा नंतर बरीच वर्षे खाण्याचा पद्धती  मधून आणि कायम स्वरुपी आयुष्यातून चमचा संस्कृती ला निरोप दिला.
   विनायक जोशी (vp)
4 December 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा