// श्री स्वामी समर्थ //
" AO Redundancy "
AO याचा अर्थ म्हणजेच ॲनालाॕग आऊट पुट.प्रोसेस कंट्रोल मधे 4-20ma करंट आऊट पूट ही अत्यंत जरुरीची गोष्ट म्हणून वापरात आहे.कंट्रोलर पासून दूर अंतरावर असलेल्या फिल्ड वरील वेगवेगळ्या लोडना किंवा ड्राइव्हजना कंट्रोल करण्यासाठी याचा वापर होतो.या लांब जाणाऱ्या वायर्स twisted आणि शिल्डेड असतात.या प्रकारच्या वायर्स मुळे नाॕइज कॕन्सलेशन आपोआप होते.याचे शिल्ड मात्र फक्त सोअर्सच्या बाजूला ground ला जोडणे जरुरीचे आहे.बहूतेक प्रोसेस प्लान्ट हे रीमोट जागी चालत असतात त्यामुळे बहूतेक महत्त्वाचे सिग्नल्स हे बॕक अप सहीत वापरलेले असतात. ऊदाहरणार्थ फिल्ड मधील एकच लोड दोन वेगवेगळ्या ॲनालाॕग औटपूट कार्डनी ड्राइव्ह केलेले असते. Intelligent redundancy मधे दोन्ही ॲनालाॕग औटपूट यांची बेरीज करुन लोड कंट्रोल केलेला असतो. समजा लोडची जरुरी ४ ma असेल तर दोन्ही माॕड्युल्स २ma + २ma असा करंट देतात .परंतु यामधील एक जरी कार्ड बंद पडले तरी दुसरे कार्ड पूर्ण म्हणजेच ४ ma करंट देतो. यालाच Intelligent AO Redundacy म्हणतात !
विनायक जोशी (vp )
9423005702
02 February 2016
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६
Intelligent AO Redundancy
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा