सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Assembly chi Abcd ........

// SSS //
" Assembly ची abcd..,"
Assembly language मधे काम करताना hardware च्या क्षमतेची पूर्ण माहीती असेल तरच अतिशय छोटा आणि सर्व समावेशक असा " कोड " लिहता येई. Crystal आणि clock या विशयी कोणतीही संदिग्धता चालत नसे. Precision routines , priorities , interrupts वगैरे गोष्टींचा व्यवस्थित वापर करावा लागे. Watch dog timer किंवा लक्ष ठेवणारा कुत्रा यांना छान ठिकाणी बसवावे लागे.सर्व ईनपुट , आउटपूट,टाईमर वगैरे आपापल्या जागेवर बसले की शेवटी  कीबोर्ड आणि display .एवढी तयारी झाली की पहीले " power on "मेसेजचे आचमन आणि नंतर टेस्ट मोड मधून सर्व Hardware शी संवाद. एकदा ईतकी तयार झाली की flow chart वगैरे मंडळींना चुकवून प्रोग्राम लिहणे सुरु. पहिल्यांदा साधे सरळ लाँजिक चेक करणे त्या नंतर on line monitoring आणि corrective actions साठी वेगळी routines .या सर्व गोष्टींचा रियाज करुन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन चे लाँजीक आत्मविश्वासाने लिहणे चालू . हळुहळु code optimization वगैरे प्रकार जमायला लागले की Assembly मधेच रममाण होणारा  शास्त्रीय गायक तयार होतो . Assembly नावाचे शास्त्रीय गायन करणाऱ्या या गायकाला , Higher level software नावाचे 'पाँप' संगीत कधीही आपले वाटत नाही.
अत्यंत श्रमपूर्वक शिकून मुक्त पणे  Assembly नावाचा गाण्याचा आनंद देणाऱ्यांवर लक्ष्मीची सुध्दा कृपा असावी एवढीच प्रार्थना 
   विनायक जोशी (vp)
   9423005702
     २३ जूलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा