// SSS //
" बँटरीजची मिटिंग "
अतिशय महत्त्वाची, असा संदेश गेल्यामुळे सर्व जण गंभीरपणे येत होते. सुरूवातीला स्कुटर पासून रणगाडयां पर्यंतच्या बँटरींनी प्रवेश केला, त्या नंतर पेन सेल, रेडीओचे सेल, पाठोपाठ घडयाळाचे छोटे सेल आपल्या बरोबर रँमच्या सेलना घेऊन आले , अतिशय भपकेबाज गाडीतून सोलर सेल आले., पाठोपाठ मिटर मधे लागणारे सेल, त्या नंतर emergency चे सेल . मिटिंगला लागणारा कोरम पूर्ण झाल्यामुळे सुरवात झाली . सुरवातीला मनुष्याच्या हितासाठी तयार झालेल्या आणि पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या ' ग्रिन" बँटरीचे भाषण झाले. त्या नतर आपल्या मुल तत्त्वाला धक्का लावणाऱ्या परंतु अतिशय छोटासा दिसणाऱ्या वस्तूच्या सभोवती सर्व जण गंभीरपणे उभे राहीले. हा नवीन येणारा device फक्त १० सेकंदात charge होणार होता , याची कपँसीटी सध्या अतिशय कमी आहे. किंमत सध्या खूप आहे वगेरे बाबींची चर्चा झाली. मिटिंग मधून बाहेर पडताना सर्व जण त्याला हाताळून पहात होते त्याचे नाव होते "Super Capacitor"!
विनायक जोशी (vp)
9423005702
२० जून २०१५
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६
Batteries ......!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा