सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Wire

//SSS//
   "तारांच्या जगात "
काँपरच्या तारांचे महात्म !
एक छोटीशी तार घ्यायची , त्याच्या मधून हळूहळू करंट वाढवायचा, थोड्या वेळाने ती रागारागाने लाल होइल , तिची लांबी वाढेल आणि शेवटी मान टाकेल "Fast blown fuse" म्हणून .आता मात्र याच तारेच्या दोन बाजूंना दोन छोटया वाट्या लावायच्या , परत वरील पध्दतच वापरायची , यावेळी मात्र थोड्या उशीराने संतापून मान टाकेल हा झाला "Slow blown fuse.
अगदी जाड तार घ्यायची आणि जास्त करंट साठी वापरायची  . याच जाड तारेला वाहणा खरा 'करंट ' आणि त्याच्या  प्रवाहा बद्दल माहिती विचारू शकता current Sensing म्हणून . ऐक छान तार घ्यायची ठराविक अंतरावर वेटोळे मारायचे , त्यातील एक टोक मोकळे सोडायचे "Antena" म्हणून . एक लांब तार घ्यायची , त्याचे अतिशय जवळ असे खुप वेढे मारायचे आणि वापरायची Relay coil म्हणून .
आता दोन भिन्न रंगाच्या तारा घ्यायच्या , त्या मोठ्या डीसी पाँवर सप्लाय ला जोडायच्या आणि सर्व modules पाँवर देऊन जागृत करायची.
आता तिन तारा घ्यायच्या त्या "एसी' ला जोडायच्या आणि सर्व आसमंत ऊजळून टाकायचा.
परत एकदा तिन तारा घ्यायच्या यामधील दोन तारा मात्र एकमेकीबरोबर फुगडी घालत आनंदाने जातील signals म्हणून , या मधिल तिसरी तार मात्र यांचा दंगा बाहेर ऐकू येणार नाहि आणि बाहेरच्यांचा त्यांना ऐकू येणार नाही याची काळजी घेते.
असो तारांच्या जगातील प्रथमो ध्याय समाप्त !
       विनायक जोशी (vp)
        9423005702
          ३० जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा