सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

टाटांची "नॕनो"

// श्री स्वामी समर्थ //
      ' टाटांची नॕनो '
अमेरिकेला जाताना जमशेटजी टाटांची आणि स्वामी विवेकानंदांची
बोटी वरच्या प्रवासात भेट झाली होती.भारतातील गरीबी दूर होण्यासाठी जपान प्रमाणेच भारतात औद्योगिक क्रांती व्हायला हवी अशी चर्चा या दोघांच्या मधे झाली. ही दोन दृष्ट्या महान व्यक्तींची भेट होती. टाटांच्या पुढच्या पिढीतील लिडर
रतन टाटांनी सर्व सामान्य लोकांना परवडेल अशी चार चाकी गाडी काढायचे स्वप्न सत्यात उतरवायचे ठरविले .त्याचे फळ म्हणून काही मर्यादां सकट पहिली 'नॕनो' हि गाडी बाजारात आली.
या गाडीत एक फार मोठा दोष होता ती म्हणजे हि गाडी सामान्य लोकांच्या साठी होती.
भारतात मोटार ही माणसाची 'प्रतिष्ठा ' मोजायचा मापदंड आहे. रस्त्यावरील वाहतूकीचे कोणतेही नियम न पाळणे, लेन सिस्टीम किंवा  सिग्नल वगैरे गोष्टीना अजिबात न जुमानता वाहन चालवणे हे आमच्या वरील संस्कार  आहेत.
पुण्यात आज बहुसंख्य लोकांकडे गाडी हि उपयुक्त म्हणून नव्हे तर फक्त प्रदर्शनासाठी दरवाज्याच्या बाहेर उभी आहे.
आपल्या देशातील मानसिक आणि रस्त्यावरील प्रदूषण कमी करायचे असेल तर गाडीतून कपॕसिटी पेक्षा एकही सिट कमी असेल तर त्या गाडीला गर्दीच्या वेळी किंवा गर्दी असलेल्या  रस्त्यावर बंदी घालणे हे जरुरीचे आहे.
माझी टाटांना विनंती आहे की 'नॕनो'चा सर्व मेकॕनिझम जसाच्या तसा एखाद्या "सेदान' सेरीज गाडी  मध्ये घालून आणि किंमत वाढवून दिली तर भारतात हि गाडी भरपूर चालेल. आम्हाला काळानुरुप धावणारा आणि व्यवहार्य घोडा नको आहे आम्हाला काडीचाही उपयोग नसलेला "पांढरा हत्ती " हवा आहे फक्त प्रतिष्ठा दाखवण्यासाठी !
विनायक जोशी (vp )
22 February 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा