बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

अन्न हे पूर्णब्रम्ह !

// श्री स्वामी समर्थ //
    " अन्न हे पूर्णब्रह्म "
आमच्या सोलापूरच्या स्वयंपाक घरात एक छान अशी चूल होती. संध्याकाळचे जेवण हे आम्ही पाच भावंडे आणि वडील असे सर्वजण एकत्रित करत असू.आई गरम गरम भाकरी करत असे आणि आजी त्या आम्हाला वाढत असे.या पंगतीला वडील बरोबर असल्यामुळे जेवताना गप्पागोष्टींना बंदी.  जेवणाच्या बाबतीत मी फारच कुरकुर करत असे.दररोज जेवताना गोड पदार्थ मला लागत असे.चौफेर आहार वगैरे संकल्पना मला मान्य नसत.या सवयीमुळे आई आणि माझ्यात दररोज जेवताना प्रेमळ संवाद घडत असे. आमच्या कडे 'देवअण्णा' नावाचे सत्पूरुष येत असत त्यांना आईने माझ्या सवयी बद्दल सांगितले . एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी ते आमच्या कडे आले होते.त्या वेळी त्यांनी चटणी ,कोशींबीर ,भाजी वगैरे सर्व गोष्टी एका ताटात वाढायला सांगितल्या .मला समोर बसवले आणि प्रत्येक गोष्टीचा फक्त एक एक घास ताटाच्या मध्यावर घ्यायला लावला .नंतर हे सर्व एकत्रित कालवायला लावले. ताटा मध्ये वाढलेले सर्व अन्न खायला लावले.त्या नंतर अन्न हे पूर्णब्रह्म आहे टाकायचे नाही असा सज्जड दम दिला. त्या वेळी मी सात वर्षाचा असेन .त्या दिवसा पासून आज पर्यंत म्हणजे वयाच्या ५२ व्या वर्षा पर्यंत ,पानात वाढलेल्या आणि अत्यंत प्रेमाने बनवलेल्या अन्नाला कधीही नावे न ठेवता आनंदाने खात आहे.
   विनायक जोशी (vp)
9 December 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा