सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Watch dog timer किंवा इलेक्ट्रॉनीक कूत्रा

// SSS //
" इलेक्ट्रॉनीक कुत्रा "
"Watch dog timer"
कंट्रोलरच्या जगात प्रवेश झाल्या नंतर वेगवेगळ्या आणि अनाकलनिय गोष्टींचा संबंध येऊ लागला. डीन रेल सिस्टीम मधे कंट्रोलर हा पुढील बाजूने चेक करणे अजिबात शक्य होत नसे.साधारणपणे दहा तास व्यवस्थित चालणारे मशीन मधूनच  एका मशीन सायकल पूरते विचित्र चालत असे. या मुळे एका मिनीटात प्रचंड नुकसान होत असे. मशीन वापरणारी मंडळी सुध्दा हताश होत असत. या वेळेला कंट्रोलर च्या हार्डवेअर चा वापर करुन या सर्व गोष्टीं वरती व्यवस्थित लक्ष  ठेवणारा हा इलेक्ट्रॉनीक कुत्रा फार उपयोगी पडत असे. सिस्टीम चालू झाली की याला सदैव पलसेस च्या रुपातील खाणे देत रहायचे आणि याला खूश ठेवायचे जर कधी कोणत्याही कारणाने कंट्रोलर भरकटला तर लगेच पहिल्यांदा भुंकुन हा सावध करत असे आणि नंतर  मशीन ला सुरवातीच्या मुळ स्थितीत आणून ठेवत असे. या मुळे मशीन अजिबात नुकसान न होता थांबत असे.
रीर्टिगरेबल टायमर या तत्त्वानुसार वागणाऱ्या या "इलेक्ट्रॉनीक कुत्र्या" मुळे आजही कंट्रोलर मुळे घडू शकणाऱ्या विघातक गोष्टींना कायमचा आळा बसला आहे.
    विनायक जोशी ( vp)
   9423005702
       21 August 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा