// श्री स्वामी समर्थ //
" सेमी इंग्लिश "
हरीभाई देवकरण नावाच्या नितांत सुंदर अशा शाळेत माझे शिक्षण झाले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या शिस्तबद्ध वातावरणात आणि दर्जेदार शिक्षकांच्या शिस्तित एकदम छान. पहिली ते चौथी नुमवी आणि हायस्कुल म्हणजे हरीभाई देवकरण. पाचवी पासून इंग्रजी चालू होत असे .इयत्ता आठवी पासून गणित , सायन्स सुध्दा इंग्रजी मधूनच . शिकवायची पद्धत इतकी सुरेख कि कोणत्याही प्रकारचा सेमी इंग्लिशचा ताण यायचा नाही .काँलेज मधे गेल्यानंतर याचा फायदा चांगलाच जाणवत असे.आम्ही दहावी मधे असताना 'मगाई 'नावाचा मराठी मिडीयम चा मुलगा बोर्डामधे पहिला आला होता. मगाई ११ वीला आमच्याच वर्गात वालचंद काँलेज मधे होता. सायन्सच्या पिरीयडला Brain , spinal cord वगैरे शब्द आले कि मराठी मिडीयमच्या मुलांना लक्षात ठेवायला अवघड जात असे. या अत्यंत हुशार मुलांना इंग्रजी मधून सायन्स शिकताना कमालीचा ताण जाणवत असे.त्या मुळे विनाकारण एक प्रकारचा न्युनगंड त्यांच्या मधे निर्माण होई .आम्ही सेमी इंग्लिश मधे शिकलो असल्यामुळे मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या बरोबर मध्यवर्ती असे आम्ही उभे होतो. लाडालाडाने रामा , लक्ष्मणा च्या जवळ नाही किंवा मस्तिष्क वगैरे पासून दूर !
विनायक जोशी ( vp)
21 November 2015
electronchikatha.blogspot.com
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६
Semi English
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा