मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

Tetra Pack आणि पोखरण

// श्री स्वामी समर्थ //
    " Tetra Pack - Nichrome "
Nichrome या कंपनीने साखर कारखाने उभे करता करता एकदम निळ्या ज्योतीचे स्टोव्ह बनवायला सुरवात केली.
याच वेळी सरकारने लघु उद्योगांना दिलेल्या संरक्षणामुळे Form Fill Seal ही ॲटोमॕटीक मशीन्स करायला सुरवात केली. या मधील सर्व भाग स्वतःच्या वर्कशाॕप मध्ये  तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करुन त्या नुसार गुणवत्ता पूर्ण उत्पादन चालू केले. Voltas या कंपनीला आमच्या मशिन्सचे Sales आणि Servicing दिल्यामुळे थोड्याच काळात पूर्ण भारतभर आमच्या कंपनीच्या मशिन्स आनंदाने नांदू लागल्या .  याच क्षेत्रातील नामवंत कंपनी म्हणजे Tetra Pack. या कंपनीने भारतातील विश्वासार्ह कंपनी म्हणून आमच्या कंपनी बरोबर भागीदारी केली. सात थरांचे पेपर वापरुन दीर्घकाळ खाद्य पदार्थ किंवा दूध वगैरे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू  टिकविण्यासाठीचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे होते. कंपनीमधे अतिशय उत्साहाचे वातावरण होते.पुण्याच्या जवळ शिरवळ पाशी ' विंग' नावाच्या गावात महिन्याला शंभर मशिन्स बनवता येतिल आणि पूर्ण जगभर विकता येईल असा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची सुरवात झाली. 'असेप्टीक 'पॕकेजिंग नावाच्या प्रकाराची पहिल्यांदाच  तोंडओळख झाली. बॕक्टेरीया पासून मुक्त असे  पँकिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन पार्टसची माहिती घेणे चालू होते.परंतु अचानक एके दिवशी आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी "अटलजींनी" पोखरण येथे अणुस्फोट घडवून संपूर्ण जगाला भारताच्या ताकदीची जाणीव करुन दिली. अर्थातच आपल्या देशाला विकसित देशांनी मदत देणे ताबडतोब  बंद केले.याचवेळी Tetra Pack ने सुद्धा आमच्या बरोबरील करार गुंडाळून ते निघून गेले. पोखरण स्फोटा नंतर जगभरातील मंडळींनी लादलेल्या बंदीला देशातील सर्व तळागाळातली मंडळी सुद्धा एक आव्हान म्हणून सामोरे गेली. या संधीचा फायदा उठवून आम्ही "अंडयाचा बलक "भरायची मशीन रशियाला निर्यात केली. पोखरणचा स्फोट हा फक्त बाजपेयींचा , कलाम, काकोडकरांचा नव्हता तर तो संपूर्ण भारताचा होता.थोड्या दिवसांनी वास्तवाची जाणीव झाल्यावर आणि शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या गिऱ्हाईकाला दुखावणे परवडणारे नव्हते याची कल्पना येऊन परदेशी कंपन्या भारतात परतल्या. या वेळेपर्यंत आम्ही आत्मनिर्भर होऊन व स्वतःच्या पायावर खंबिर पणाने उभे राहून बाहेरील देशात निर्यात चालू केली होती . Tetra pack हा विषय आमच्या कंपनी साठी संपलेला होता.!!
    विनायक जोशी (vp)
      28 August 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा