" श्री स्वामी समर्थ "
" पंप आणि मी"
अगदी लहानपणी सायकल मधे हवा भरताना पहिल्यांदा याचा वापर केला.त्या नंतर राँकेल भरायसाठी पंप वापरला. सुट्टी मधे मुंबईला गेलो तेव्हा पाणीपुरवठा करणारा पंप बघितला . या नंतर शेतावरील पंपाचे दर्शन घडले.नोकरी लागल्या नंतर काम करताना मेडीकल मधे वापरावे लागणारे किंवा औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे बरेच पंप बघितले . मला सर्वात जवळचा वाटणारा पंप म्हणजे बोअरवेल चा पंप. पाणी ओढणारा आणि पाठवणारा. वरील सर्व पंपांचे कार्य समजून घेता आले.या मधे काही manual पंप होते.तर काही विजेवर चालणारे वगैरे. असाच एक पंप आपल्या शरीराच्या आत आहे.अशुद्ध रक्त ओढून घेणारा आणि शुद्ध रक्त सर्व शरीरभर योग्य दाबाने पाठवणारा.हा पंप हे फार मोठे कोडे आहे. याला देवाने start करुन आपल्याला दिला आहे. या पंपाचा वेग मात्र माझा "मी" पणा कंट्रोल करत आहे. माझा सर्व आनंद मला मिळणाऱ्या " मान " या गोष्टी भोवती केंद्रित आहे. चुकून जरी कोणीही माझा "अपमान " केला की संतापाने या पंपाचा वेग वाढतो. त्या मुळे जास्त दाबाने रक्त सर्व शरीराच्या आत बारीकसारीक पाईपां मधून वहायला लागते . या मधील काही नाजूक पाईप या जास्त दाबाने फुटतात . अर्थातच हे फुटलेले पाईप नैसर्गिक रीतीने दुरूस्त केले जातात परंतू या कामा मधूनच Blockages किंवा अडथळे तयार होतात. वयाची ५० वर्षे ओलांडून पुढे गेलेल्या मंडळींनी कोणतीही गोष्ट सिद्ध करायच्या भानगडीत पडू नये. सर्व ठिकाणी आपले स्वतःचे काम स्वतः करणे. साफ सफाई कामगारांच्या पासून ते अधिकारी मंडळीं पर्यत सर्वांच्या कामाचा आदर राखणे. जास्तीत जास्त शारीरिक कष्ट करणे. कारण नसताना करोडो रुपयांच्या गप्पा न मारणे. तरुण मंडळींना आपल्या अपेक्षा न लादता काम करु देणे. या जगात आपणच फक्त सत्वगूणी , आदर्शवादी वगैरे आहोत हा गैरसमज काढून टाकणे. पु.ल वगैरे दर्जेदार साहित्यिक शंभर वर्षातून एकदाच जन्माला येतात त्या मुळे नवीन आणि निखळ असे वाचायला मिळत नसेल तरी आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींना दाद देऊन आनंदी रहाणे . अशा गोष्टीं मधूनच आपल्या शरीराच्या आतील पंप कमी किंवा जास्त असे भावनिक धक्के उत्तम रीतीने सहन करुन कार्यक्षमतेने चालू राहील .
विनायक जोशी (vp)
21 September 2015
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६
" पंपांची कथा "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा