शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

"गुरुत्वाकर्षण" आणि मी

// श्री स्वामी समर्थ //
  " गुरुत्वाकर्षण "
आजही मला या शोधाबद्दल आश्चर्य वाटते. कोणत्याही झाडावरून पडणारे फळ हे नैसर्गिकरीत्या  आकाशातील बापाकडे जाण्यापेक्षा धरती माते कडेच वेगाने जाईल असे अजूनही वाटते. १९८४ साली लहान भावाच्या काँलेज मधील प्रोजेक्ट साठी कराड इंजिनियरींग काँलेज मधे मुख्य असलेल्या सरांना भेटायला गेलो.त्यांनी झाडावरुन पडणाऱ्या पानाची velocity मोजा वगैरे सांगितले .या नंतर मात्र  बरीच वर्षे "Depth" "velocity " "gravity " वगैरे घाबरवणारे शब्द आसपास आले नव्हते . Tata Tea या चहाच्या मशीनच्या वेळी पहिल्यांदा या Gravity ला टाळून चालणार नाही याचा प्रत्यय आला.बेसिक मशिनच्या डोक्यावरती साधारणपणे जमिनीपासून १२ फूट उंचीवरती चहा अचूक मोजायसाठीची  weighing system असायची. अचूक पणे मोजलेला हा चहा येथून ८ फूट खाली पिशवीत पडायचा.हा वेगवान प्रवास पूर्णपणे gravity च्या ताब्यात असे. या वेळी पहिल्यांदा 1/2 gt square ने आमच्या आयुष्यात प्रवेश केला.मशिनचा वेग नियंत्रित करणाऱ्या अदृश्य शक्ती चा संचार अनुभवला. मशिनचा वेग हा फक्त इलेक्ट्रॉनीक किंवा मेकँनिकल गोष्टींवर अवलंबून नसून गुरुचे तत्त्व आणि गुरु बद्दलचे आकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षणा वरती अवलंबून आहे ही वस्तूस्थिती लक्षात आली !!!
विनायक जोशी (vp)
8 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा