सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

आनंदी सप्ताह निखिल आणि सर्वेश बरोबर

// श्री स्वामी समर्थ //
  " निखिल आणि सर्वेश "
      "आनंदी सप्ताह "
बरोबर मागच्या शनिवारी म्हणजे २० मे रोजी कल्याणीच्या भाच्यांनी पुण्यात प्रवेश केला. आई वडिलांना सोडून हे दोघे आले. एकटे राहिले आणि आठ दिवसांत इथल्या खूप गोष्टींवर आपला ठसा सोडून गेले.
आमच्या बरोबर राहिल्याने सकाळी लवकर उठून दररोज वेगवेगळ्या ठिकाणांच्या वाऱ्या घडवून आणल्या .अगदी पर्वती पासून ते सारस बाग, तळजाई, वाघजाई, विठ्ठल मंदीर,दगडूशेठ,जोगेश्वरी वगैरे ठिकाणे झाली. नंतर बालाजी,मोदी गणपती ,अभिरुची माँल . दुपारी पत्ते , संध्याकाळी cricket आणि रात्री दहा नंतर बँडमिंटन असा फुल to धमाल कार्यक्रम होता .
आज सकाळी लवकरच त्यांना सोडायला स्वारगेट ला गेलो. गाडी यायला एक तास उशीर होता. बरेच वेळेला  'निरोप' घेताना  हा उशीर छान वाटतो .शेवटच्या क्षणा पर्यंत  गप्पा चालू रहातात. माझ्या मधील खोडकर मुलामुळे आमची वेव्हलेंग्थ लगेचच मॕच झाली.
शेवटी मायकेल शूमाकरला लाजवेल अशा झोकात ड्रायव्हर ने St आणली.
एका आनंददायी सहवासाची हि तात्पुरती समाप्ती होती . अर्थातच वळण जसे सरळ नसते तसाच निरोप सुध्दा कधीही आनंदी नसतो !!
                विनायक जोशी
                     २४ मे २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा