गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

नामदेव शिंपी पुणे कॕम्प !!!

// श्री स्वामी समर्थ //
  "नामदेव शिंपी "
संत नामदेव यांच्या  पलिकडे या विषयाचे मला विशेष ज्ञान नव्हते . १९८५ , ८६,८७ हि तीन वर्षे मी कँम्प मधे मेनस्ट्रीट वरती रहात होतो .त्या वेळी नामदेव शिंपी मंडळींचा संबंध आला.इंग्रजांच्या काळापासून सैनिकांना लागणाऱ्या कपड्यांवर यांचा व्यवसाय चालू होता.इंग्रज गेल्या नंतर मात्र थोडे दिवस भारतीय सैनिक आणि त्या नंतर रजनीशांचे शिष्य . हिरवे,लचके,बकरे,भावकर,बगाडे,निखल,सुबंध,
भांबुरे वगैरे माझे कँम्प मधील मित्र . या सर्व मंडळींचे वैशिष्ट्य म्हणजे या मधील प्रत्येक माणसाच्या बोटांमधे असलेली जादू.कोणत्याही प्रकारच्या कष्टाची तयारी.एकदा आपल्याला त्यांनी आपले मानले की कोणताही मागचापुढचा विचार न करता ते कायम आपल्या बरोबरीने रहाणार .कँम्पमधील खास हिंदी बोलणारी हि मंडळी तेथिल संस्कृती जपून आहेत.अतिशय छान रामाचे मंदिर आहे.त्यांच्या समाजातील मान्यवर लोकाचे मंडळ आहे. शक्यतो बऱ्याचशा अंतर्गत कलहांचा तेच निवाडा करतात.नाझचा सामोसा , मार्झोरीनची सँडवीच, कँपिटाँल आणि वेस्टएंड चे सिनेमे आणि कायम लगबगीने हिंडणारे हे नामदेव शिंपी ! आज ३० वर्षे झाली .आमची मित्र मंडळी सुद्धा पन्नाशीला आली . या ३० वर्षात मैत्री मात्र मुरलेल्या लोणच्या सारखीच दीर्घकाळ टीकणारी झाली आहे !
विनायक जोशी (vp)
10 October 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा