शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

Diode Bridge !!

// श्री स्वामी समर्थ //
      " Diode Bridge "
Sine wave नावाच्या अतिशय सुंदर आणि अवखळ अशा Wave ला शांत अशा DC मध्ये रुपांतरीत करण्याचे काम हे Diode Bridge करतात. चौघांनी मिळून दोन थरांच्या  दहिहंडीची तयारी करावी तसे ते एकमेकांच्या खांद्यावर ऊभे असतात.
ठरावीक amplitude च्या टेकडीवर चढणारी आणि परत तेवढयाच खोलीच्या दरीत जाणाऱ्या Sine wave ला न दुखावता ह्या Diode bridge ला काम करावे लागते. Diode हे स्वतः फक्त positive विचारसरणीचे असल्यामुळे Sine wave चा दरीकडे जाणारा मार्ग बंद करुन  तेवढयाच वेळात दोनदा  Pulsating DC नावाच्या टेकडीवर नेऊन परत जमीनीवर घेऊन येतात. यांच्या Output ला एखादा कपॕसिटर नावाचा मित्र ऊभा असेल तर मात्र या Pulsating DC चे रुपांतर करवतीच्या दातां सारखे दिसु लागते . या Saw tooth waveform ला रीपल म्हणून ओळखले जाते. कपँसिटर चे आकारमान कमी असेल तर मात्र जास्त रीपल ची Triangular wave असे याचे बारसे होते. Sine wave चे चैतन्य कायम ठेवून output ला सौम्य बदलत रहाणारे DC voltage पाहीजे असेल तर अचूक आकारमानाचा कपॕसिटर वापरावा आणि Saw tooth च्या रुपात खळाळत्या पाण्या सारखे DC  voltage ने  प्रवाही रहावे !
विनायक जोशी ( vp)
16 November 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा