// श्री स्वामी समर्थ //
" धृवबाळ "
'Two Wire Transmitter "
जेम्स वँटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि वाफ ही दवडायची नसून वापरायची गोष्ट आहे हे लक्षात आले.याचीच पुढील पायरी म्हणून ३ ते १५पीएसआय या pneumatic concept ने process control मधे बरीच वर्षे अधिराज्य गाजवले.
या मधे ३ पीएसआय ही live zero असे.याचवेळी computing machines चा वापर चालू झाला. . खरगपुर IIT मधे १९७१ साली साधारण दोन मजली इमारती इतके उंच computing machine होते आणि डोक्यावरून जाणारी भारतीय पायदळाला संरक्षणासाठी चाललेली विमाने.
१९८० च्या दशकात प्रोसेस कंट्रोल मधे अतिशय छोट्या ॲनालाॕग सिग्नल्सना सेन्सर्स जवळच ४-२०ma मधे convert करायची पध्दत वापरली जावू लागली. गेली ३० वर्षे जगभर कोटयवधी sensor's या अत्यंत विश्वसनीय पध्दतीचा वापर करून उत्तम असे काम करत आहेत. फक्त दोन वायर वापरून काम करणारा आणि अत्यंत अस्थिर वातावरणात कमालीचा स्थिर रहाणारा असा हा Two wire Transmitter आहे. गेल्या तीस वर्षात फक्त Hart compatible एवढाच आधुनिक बदल मान्य करणारा आणि अत्यंत सुरेख पध्दतीने signal पाठवणारा असा प्रोसेस मधील अढळ पद राखलेला हा "धृवबाळ" आहे.
विनायक जोशी (vp)
१ जुलै २०१५
electronchikatha.blogspot.com
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६
धृवबाळ उर्फ Two Wire Transmitter.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा